You are currently viewing The Class Divide

The Class Divide

Title – The Class divide
By Satish

चंद्रपूर समवेत मध्यभारत हा जगातील सर्वात उष्ण भाग समजला जातो, उन्ह एवढे की सकाळचे ११ वाजले तरी बाहेर पडणं मुश्कील.आणि याच रणरणत्या उन्हात १३ जणांचा एक समूह चंद्रपूरहून थेट झारखंडला जायला साधारण ११०० किमीचा पायदळ प्रवास करत निघाला आहे.
शोधग्रामजवळच यांच्याशी आज भेट झाली. थोडी विचारपूस केली तर समजले की हे सर्वजण चंद्रपूरला एका स्टील प्लांटमध्ये काम करत होते. तुम्ही चंद्रपूरलाच थांबले का नाही अशा प्रश्न विचारला असता त्याच्यापैकी एक जण म्हणाला की, “ कब तक उबाले हुये आलू खाके जिये, वैसे भी वहा मरना ही था, चलते चलते बच गये तो गाव पहुचेंगे” हे उत्तर ऐकून मी एकदम शांत झालो.

प्रश्न निर्माण कोणी केला, शिक्षा भोगताय कोण ? समाजामध्ये जेव्हा केव्हा मोठे प्रश्न उद्भवतात तेव्हा पहिली झळ ही गरीब आणि उपेक्षित वर्गाला बसते. मध्यमवर्ग आरडाओरडा करून आपल्यासाठी पर्यायी व्यवस्था लवकरच उभारून घेतो. पण स्वतःचा आवाज आणि राजकीय वजन नसलेल्या वर्गाकडे जीवघेण दुर्लक्ष होते हे मात्र नक्की.
ऑनलाइन कवीकट्टा, वर्क फ्रोम होम, झूम मिटिंग, नेटफ्लिक्स आणि लॉकडाऊन मधील वेळेचा सदुपयोग करून बनविलेले खमंग पदार्थ एकीकडे आणि भूक, निराशा, अनिश्चितता, शेकडो किलोमीटरची पायपीट, अमानवीय कष्ट आणि उष्माघाताने मृत्यू दुसरीकडे.

सतीश

Leave a Reply

5 × 5 =